Main Content:

Sai Baba Kakad Aarti



1. भूपाळी

Podcast


जोडूनियां कर चरणीं ठेविला माथा ।  परिसावी विनंती माझी सदुरुनाथा ।। 1 ।।
असो नसो भाव आलों तूझिया ठाया ।  कृपादृष्टीं पाहें मजकडे सदुरुया ।। 2 ।।
अखंडित असावें ऐसें वाटतें पायी ।  सांडूनी संकोच ठाव थोडासा देईं ।। 3 ।।
तुका म्हणे देवा माझी वेडीवांकुडी ।  नामें भवपाश हातीं आपुल्या तोड़ी ।। 4 ।।



3. भूपाळी
उठा उठा श्री साईनाथ गुरु चरणकमल दावा ।  आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा ।। ध्रु0 ।।
गेली तुम्हां सोडुनियां भवतमरजनी विलया ।  परि ही अज्ञानासी तुमची भलवि योगमाया ।
शक्ति न आम्हां यत्किंचितही तिजला साराया ।  तुम्हीच तीतें सारुनि दावा मुख जन ताराया ।। चा0 ।।
भो साइनाथ महाराज भवतिमिरनाशक रवी ।  अज्ञानी आम्ही किती तव वर्णावी थोरवी ।
ती वर्णितां भागले बहुवदनि शेष विधि कवी ।। चा0 ।।
सकृप होउनि महिमा तुमचा तुम्हीच वदवावा ।। आधि0 ।। उठा0 ।। 1 ।।
बक्त मनीं सद्घाव धरुनि जे तुम्हां अनुसरले ।  ध्यायास्तव ते दर्शन तुमचें द्घारि उभे ठेले । 
ध्यानस्था तुम्हांस पाहुनी मन अमुचें धालें ।  परि त्वद्घचनामृत प्राशायातें आतुर झालें ।। चा ।।
उघडूनी नेत्रकमला दीनबंधु रमाकांता ।  पाहिं बा कृपादृष्टीं बालका जशी माता ।
रंजवी मधुरवाणी हरीं ताप साइनाथा ।। चा0 ।।
आम्हीच अपुले काजास्तव तुज कष्टवितों देवा ।  सहन करिशिल तें ऐकुनि घावी भेट कृष्ण धांवा ।। उठा उठा0 ।। आधिव्याधि0 ।। 2 ।।


2. भूपाळी
उठा पांडुरंगा आतां प्रभातसमयो पातला ।  वैष्णवांचा मेळा गरुडपारीं दाटला ।। 1 ।।
गरुडपारापासुनी महाद्घारापर्यंत ।  सुरवरांची मांदी उभी जोडूनियां हात ।। 2 ।।
शुकसनकादिक नारद-तुबंर भक्तांच्या कोटी ।  त्रिशूल डमरु घेउनि उभा गिरिजेचा पती ।। 3 ।।
कलीयुगींचा बक्त नामा उभा कीर्तनीं ।  पाठीमागें उभी डोळा लावुनियां जनी ।। 4 ।।


4. भूपाळी
उठा पांडुरंगा आतां दर्शन घा सकळां ।  झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ।। 1 ।।
संत साधू मुनी अवघे झालेती गोळा । सोडा शेजे सुख आतां बंघु घा मुखकमळा ।। 2 ।।
रंगमंडपी महाद्घारीं झालीसे दाटी ।  मन उतावीळ रुप पहावया दृष्टी ।। 3 ।।
राही रखुमाबाई तुम्हां येऊं घा दया ।  शेजे हालवुनी जागें करा देवराया ।। 4 ।।
गरुड हनुमंत उभे पाहती वाट ।  स्वर्गीचे सुरवर घेउनि आले बोभाट ।। 5 ।।
झालें मुक्तद्घार लाभ झाला रोकडा ।  विष्णुदास नामा उभा घेऊनि कांकाड़ा ।। 6 ।।


5. अभंग
घेउनियां पंचारती ।  करुं बाबांसी आरती ।।  करुं साई सी0 ।। 1 ।।
उठा उठा हो बांधव ।  ओंवाळूं हा रमाधव ।। सांई र0 ।। ओं 0 ।। 2 ।।
करुनीयां स्थीर मन ।  पाहूं गंभीर हें ध्यान ।। साईंचें हें0 ।।  पा0 ।। 3 ।।
कृष्णनाथा दत्तसाई ।  जडो चित्त तुझे पायीं ।। साई तु0 ।। जडो0 ।। 4 ।।


6. कांकंड आरती
कांकडआरती करीतों साईनाथ देवा ।  चिनमयरुप दाखवीं घेउनि बालक-लघुसेवा ।। ध्रु0 ।।
काम क्रोध मद मत्सर आटुनी कांकडा केला ।  वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजवीला ।
साईनाथगुरुभक्तिज्वलनें तो मी पेटविला ।  तद्वृत्ती जाळुनी गुरुनें प्रकाश पाडिला ।
द्घेत-तमा नासूनी मिळवी तत्स्वरुपीं जीवा ।। चि0 ।। 1 ।।
भू-खेचर व्यापूनी अवघे हृत्कमलीं राहरसी ।  तोचि दत्तदेव तू शिरड़ी राहुनी पावसी ।
राहुनि येथे अन्यत्रहि तू भक्तांस्तव धांवसी ।  निरसुनियां संकटा दासा अनुभव दाविसी ।
न कळे त्वल्लीलाही कोण्या देवा वा मानवा ।। चि0 ।। 2 ।।
त्वघशदुंदुभीनें सारें अंबर हेंकोंदलें ।  सगुण मूर्ति पाहण्या आतुर जन शिरडी आले । 
प्राशुनि त्वद्घचनामृत अमुचे देहभान हरपलें ।  सोडूनियां दुरभिमान मानस त्वच्चरणीं वाहिले ।
कृपा करुनियां साईमाउले दास पदरिं ध्यावा ।। चि0 ।। कां0 चि0 ।। 3 ।।


पद (उठा उठा)
उठा साधुसंत साधा आपुलालें हित ।  जाईल जाईल हा नरदेह मग कैंचा भगवंत ।। 1 ।।
उठोनियां पहांटे बाबा उभा असे विटे ।  चरण तयांचे गोमटे अमृतदृष्टि अवलोका ।। 2 ।।
उठा उठा हो वेगेंसीं चला जाऊंया राइळासी ।  जळतिल पातकांच्या राशी कांकंडआरती देखिलिया ।। 3 ।।
जागें करा रुक्मिणीवर, देव आहे निजसुरांत ।  वेंगें लिंबलोण करा दृष्ट होईल तयासी ।। 4 ।।
दारीं वाजंत्रीं वाजती ढोल दमामे गर्जती ।  होते कांकडआरती माइया सदगरुरायांची ।। 5 ।।
सिंहनाद शंखभेरी आनंद होतो महाद्घारी ।  केशवराज विटेवरी नामा चरण वंदितो ।। 6 ।।


भजन
साईनाथगुरु माझे आई ।  मजला ठाव घावा पायीं ।।
दत्तराज गुरु माझे आई ।  मजला ठाव घावा पायीं ।।
श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज क जय ।।


श्री सांईनाथ प्रभाताष्टक
प्रभातसमयीं नभा शुभ रविप्रभा फांकली ।  स्मरे गुरु सदा अशा समयिं त्या छळे ना कली ।।
म्हणोनि कर जोडूनी करुं अतां गुरुप्रार्थना ।  समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 1 ।।
तमा निरसि भानु हा गुरुहि नासि अज्ञानता ।  परन्तु गुरुची करी न रविही कधीं साम्यता ।।
पुन्हां तिमिर जन्म घे गुरुकृपेनि अज्ञान ना ।  समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 2 ।।
रवि प्रगट होउनि त्वरित घालवी आलसा ।  तसा गुरुहि सोडवी सकल दुष्कृतीलालसा ।।
हरोनि अभिमानही जडवि तत्पदीं भावना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 3 ।।
गुरुसि उपमा दिसे विधिहरीहरांची उणी ।  कुठोनि मग येई ती कवनिं या उगी पाहुणी ।।
तुझीच उपमा तुला बरवि शोभते सज्जना ।  समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 4 ।।
समाधि उतरोनियां गुरु चला मशीदीकडे ।  त्वदीय वचनोक्ति ती मधुर वारिती सांकडें ।।
अजातरिपु सदुरो अखिलपातका भंजना ।  समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 5 ।।
अहा सुसमयासि या गुरु उठोनियां बैसले ।  वोलोकुनि पदाश्रिता तदिय आपदे नासिलें ।।
असा सुहितकारि या जगतिं कोषिही अन्य ना ।  समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 6 ।।
असे बहुत शाहणा परि न ज्या गुरुची कृपा ।  न तत्स्वहित त्या कळे करितसे रिकाम्या गपा ।।
जरी गुरुपदा धरी सुदृढ़ भक्तिने तो मना ।  समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 7 ।।
गुरो विनति मी करीं हृदयमंदिरीं या बसा ।  समस्त जग हें गुरुस्वरुपची ठसो मानसा ।।
करो सतत सत्कृती मतिहि दे जगत्पावना ।  समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 8 ।।


स्रग्धरा
प्रेमें या अष्टकासी पढुनि गुरुवरा प्रार्थिती जे प्रभातीं ।
त्यांचे चित्तासि देतों अखिल हरुनियां भ्रांति मी नित्य शांती ।।
ऐसें हें साईनाथें कथुनि सुचविलें जेविं या बालकासी ।
तेवीं त्या कृष्णपायीं नमुनि सविनयें अर्पितों अष्टकासी ।। 1 ।।


पद
1. सांई रहम नजर करना, बच्चों का पालन करना ।। धु0 ।।
जाना तुमने जगत्पसारा, सबही झूठ जमाना ।। साई0 ।। 1 ।।
मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझको प्रभु दिखलाना ।। साई0 ।। 2 ।।
दास गनू कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना ।। साई0 ।। 3 ।।

2. रहम नजर करो, अब मोरे साई, तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई ।। धु0 ।।
मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा ।।  मैं ना जानूं अल्लाइलाही ।। 1 ।।
खाली जमाना मैंने गमाया, साथी आखिर का किया न कोई इलाही ।। 2 ।।
अपने मस्जिद का झाडू गनू है ।  मालिक हमारे, तुम बाबा साई ।। 3 ।।

3. तुज काय देऊं सावळ्या मी खाया तरी, मी दुबली बटिक नाम्याची जाण श्रीहरी ।
उच्छिष्ट तुला देणें ही गोष्ट ना बरी, तूं जगन्नाथ, तुज देऊँ कशी रे भाकरी ।
नको अंत मदीय पाहूं सख्या भगवंता ।  श्रीकांता ।
माध्यान्हरात्र उलटोनि गेली ही आतां ।  आण चित्ता ।
होईल तुझा रे कांकडा की राउळांतरीं ।  आणतील भक्त नैवेघ हीनानापरी ।।

4. श्री सदगुरु बाबासाई तुजवांचुनि आश्रय नाही, भूतली ।। धु0 ।।
मी पापी पतित धीमंदा ।  तारणें मला गुरुनाथा, झडकरी ।। 1 ।।
तूं शांतिक्षमेचा मेरु ।  तूं भवार्णवींचें तारुं, गुरुवरा ।। 2 ।।
गुरुवस मजसि पामरा, अतीं उद्घरा, त्वरिक लवलाही, त्वरित लवलाही,
मी बुडतों भवभय डोही उद्घरा ।। श्री सदगु0 ।। 3 ।।


कांकड आरतीचा कार्यक्रम समाप्त


« Last Edit: December 23, 2007, 12:08:56 AM by Sai Baba »

December 22, 2007, 11:24:17 PM

About The Author

Comments

Add a Comment

Only registered members can post comments, please click here to register.

Pages: [1]