Main Content:

Sai Baba Madhyana Aarti

माध्यान्ह आरती, दुपारी 12 वाजता

घेउनियां पंचारती ।  करुं बाबांसी आरती ।। करुं साईसी0 ।। 1 ।।

उठा उठा हो बांधव ।  ओंवाळूं हा रमाधव ।। साई र0 ।। ओ0 ।। 2 ।।

करुनीयां स्थीर मन ।  पाहूं गंभीर हें ध्यान ।। साईचें हे0 ।। पा0 ।। 3 ।।

कृष्णनाथा दत्तसाई ।  जडो चित्त तुझे पायीं ।। साईतु0 जडो0 ।। 4 ।।


आरती

1.  आरती साईबाबा ।  सौख्यदातार जीवा । चरणरजातला ।

घावा दासां विसांवा, भक्तां विसांवा ।। आ. धु. ।।

जाळुनियां अनंग ।  स्वरुपरुपीं राहे दंग ।  मुमुक्षुजनां दावी । 
निज डोळां श्री रंग ।। आ0 ।। 1 ।।

जया मनी जैसा भाव ।  तया तैसा अनुभव ।  दाविसी दयाघना ।
ऐसी तुझी ही माव ।। आ0 ।। 2 ।।

तुमचें नाम ध्यातां ।  हरे संसृतिव्यथा ।  अगाध तव करणी । 
मार्ग दाविसी अनाथा ।। आ0 ।। 3 ।।

कलियुगीं अवतार ।  सगुणब्रहम साचार ।  अवतीर्ण झालसे ।
स्वामी दत्त दिगंबर ।। द0 ।। आ0 ।। 4 ।।

आठां दिवसां गुरुवारीं ।  भक्त करिती वारी । प्रभुपद पहावया ।
भवभय निवारी ।। आ0 ।। 5 ।।

माझा निजद्रव्यठेवा ।  तव चरणरजसेवा मागणें हेंचि आतां । 
तुम्हां देवाधिदेवा ।। आ0 ।। 6 ।।

इच्छित दीन चातक ।  निर्मल तोय निज सुख ।
पाजावें माधवा या ।  सांभाळ निज आपुली भाक ।। आ0 ।। 7 ।।



2. जय देव जय देव दत्ता अवधूता ।  साई अवधूता । 
जोडुनि कर तव चरणीं ठेवतों माथा ।  जय देव जय देव ।। धु ।।

अवतरसी तूं येतां धर्मातें ग्लानी ।  नास्तिकांनाही तू लाविसि निजभजनीं ।
दाविसि नाना लीला असंख्य रुपांनीं ।  हरिसी दीनांचें तू संकट दिनरजनी ।। ज0 ।। 1 ।।

यवनस्वरुपीं एक्या दर्शन त्वां दिधलें ।  संशय निरसुनियां तदद्घैता घालविलें ।
गोपीचंदा मंदा त्वांची उद्घरिलें ।  मोमिन वंशीं जन्मुनि लोकां तारियल ।। ज0 ।। 2 ।।

भेद न तत्वीं हिंदूयवनांचा कांहीं ।  दावायासी झाला पुनरपि नरदेही । 
पाहसिं प्रेमानें तू हिंदूयवनांही ।  दाविसी आत्मत्वाने व्यापक हां साई ।। ज0 ।। 3 ।।

देवा साईनाथ त्वत्पदनत व्हावें ।  परमायामोहित जनमोचन झणिं व्हावें ।
त्वत्कृपया सकलांचें संकट निरसावें ।  देशिल तरि दे त्वघश कृष्णानें गावें ।। ज0 ।। 4 ।।


अभंग

शिरडी माझें पंढरपुर ।  साईबाबा रमावर ।। 1 ।।

शुद्घ बक्ती चंद्रभागा ।  भाव पुंडलीक जागा ।। 2 ।।

या हो या हो अवघे जन ।  करा बाबांसी वंदन ।। 3 ।।

गणू म्हणे बाबा साई ।  धांव पाव माझे आई ।। 4 ।।


नमन

घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळयांनीं पाहीन रुप तुझें ।।
प्रेमें आलिंगिन, आनंदें पूजिन, भावें ओंवाळिन म्हणे नामा ।। 1 ।।

त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बेधुश्च सखा त्वमेव ।।
त्वमेव विघा द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव ।। 2 ।।

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुद्घयात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।
करोति यघत्सकलं परस्मै, नारायणायेति समर्पयामि ।। 3 ।।

अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्र भजे ।। 4 ।।


नामस्मरण
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे (इति त्रिवार)


पुष्पांजली
ऊँ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माण प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्या संति देवाः ।।
ऊँ राजाधिराजाय प्रसहृसाहिने नमो वयं वैश्रवणाय कूर्महे ।
स मे कामान्कामाय महृं कामेश्वरो वैश्रवणो दधातु ।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ।

ऊँ स्वस्ति ।  साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठयं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी स्यात्सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यताया एकराळिति ।

तदप्येष श्लोकोडभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे ।
आविश्रितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।।


नमस्कारष्टक

अनंता तुला तें कसें रे स्तवावें ।  अनंता तुला तें कसें रे नमावें ।
अनंत मुखांचा शिणे शेष गातां ।  नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ।। 1 ।।
स्मरावें मनीं त्वत्पदां नित्य भावें ।  उरावें तरी भक्तिसाठीं स्वभावें ।।
तरावें जगा तारुनी मायताता ।  नमस्कार0 ।। 2 ।।

वसे जो सदा दावया संतलीला ।  दिसे अज्ञ लोकांपरी जो जनांला ।।
परी अंतरीं ज्ञान कैवल्यदाता ।  नमस्कार0 ।। 3 ।।

बरा लाधला जन्म हा मानवाचा ।  नरा सार्थका साधनीभूत साचा ।।
धरुं साइप्रेमा गळाया अहंता ।  नमस्कार0 ।। 4 ।।

धरावें करीं सान अल्पज्ञ बाला ।  करावें अम्हां धन्य चुंबोनि गाला ।।
मुखीं घाल प्रेमें खरा ग्रास आतां ।  नमस्कार 0 ।। 5 ।।

सुरादीक ज्यांच्या पदा वंदिताती ।  शुकादीक जयांतें समान्तव देती ।।
प्रयागादि तीर्थें पदीं नम्र होतां ।। नमस्कार0 ।। 6 ।।

तुझ्या ज्यां पदा पाहतां गोपबाली ।  सदा रंगली चित्वस्वरुपीं मिळाली ।।
करी रास क्रीडा सवें कृष्णनाथा ।  नमस्कार0 ।। 7 ।।

तुला मागतों मागणें एक घावें ।  करा जोड़ितों दीन अत्यंत भावें ।।
भवीं मोहनीराज हा तारि आतां ।  नमस्कार साष्टांग श्री साइनाथा ।। 8 ।।
 

प्रार्थना
ऐसा यई बा ।  साई दिगंबरा ।  अक्षयरुप अवतारा । 
सर्वहि व्यापक तूं ।  श्रुतिसारा ।  अनुसयाडत्रिकुमारा ।। धु0 ।।

काशी स्नान जप, प्रतिदिवशीं ।  कोल्हापुर भिक्षेसी । 
निर्मल नदि तुंग, जल प्राशी ।  निद्रा माहुर देशीं ।। ऐ0 ।। 1 ।।

झोळी लोंबतसे वामकरीं ।  त्रिशूल-डमरु-धारी । 
भक्तां वरद सदा सुखकारी ।  देशील मुक्ती चारी ।। ऐ0 ।। 2 ।।

पायीं पादुका जपमाला कमंडलू मृगछाला ।  धारण करिशी बा ।
नागजटा मुगुट शोभतो माथां ।। ऐ0 ।। 3 ।।

तत्पर तुझ्या या जे ध्यानीं ।  अक्षय त्यांचे सदनीं । 
लक्ष्मी वास करी दिनरजनीं ।  रक्षिसि संकट वारुनि ।। ऐ0 ।। 4 ।।

या परिध्यान तुझें गुरुराया ।  दृश्य करीं नयनां या ।
पूर्णानंदसुखें ही काया ।  लाविसि हरिगुण गाया ।। ऐ0 ।। 5 ।।


श्री साईनाथमहिम्नस्तोत्रम्

सदा सत्स्वरुपं चिदानंदकंदं, जगत्संभवस्थानसंहारहेतुम् ।
स्वबक्तेच्छया मानुषं दर्शयंतं, नमामीश्वरं सदगुरुसाइनाथम् ।। 1 ।।

भवध्वांतविध्वंसमार्तडमीडयं, मनोवागतीतं मुनीध्र्यानगम्यम् ।
जगदव्यापकं निर्मलं निर्गुणं त्वां, नामामी 0 ।। 2 ।।

भवांभोधिमग्नार्दितानां जनानां, स्वपादश्रितानां ।
स्वभक्तिप्रियाणाम् ।  सुमद्घारणार्थ कलौ संभवंतं नमामी 0 ।। 3 ।।

सदा निंबवृक्षस्य मूलाधिवासात्सुधासाविणं तित्तमप्यप्रियं तम् ।
तरुं कल्पवृक्षाधिकं साधयंतं, नमामी ।। 4 ।।

सदा कल्पवृक्षस्य तस्याधिमूले भवद्घावबुद्घया सपर्यादिसेवाम् ।
नृणां कुर्वतां भुक्तिमुक्तिप्रदं तं, नमामी ।। 5 ।।

अनेकाश्रुतातक्र्यलीला विलासैः, समाविष्कृतेशानभास्वत्प्रभावम् ।
अहंभावहीनं प्रसन्नात्मभावं, नमामी ।। 6 ।।

सताः विश्रमाराममेवाभिरामं सदा सज्जनैः संस्तुतं सन्नमद्घिः ।
जनामोददं भक्तभद्रप्रदं तं, नमामी ।। 7 ।।

अजन्माघमेकं परं ब्रहृ साक्षात्स्वयं संभवं राममेवावतीर्णम् ।
भवदर्शनात्संपुनीतः प्रभोडहं, नमामी ।। 8 ।।

श्री साईशकृपानिधेडखिलनृणां सर्वार्थसिद्घिप्रद ।
युष्मत्पादरजः प्रभावमतुलं धातापि वक्ताडक्षमः ।।
सद्घक्त्या शरणं कृतांजलिपुटः संप्रापितोडस्मि प्रभो,
श्रीमत्साईपरेशापादकमलात्रान्यच्छरण्यं मम ।। 9 ।।

साईरुपधरराघवोत्तमं, भक्तकामविबुधद्रुमं प्रभुम ।
माययोपहतचित्तशुद्घये, चिंतयाम्यहमहनिशं मुदा ।। 10 ।।

शरत्सुधांशुप्रतिमप्रकाशं, कृपापात्रं तव साईनाथ ।
त्वदीयपादाब्जमसमाश्रितानां स्वच्छायया तापमपाकरोतु ।। 11 ।।

उपासनादैवतसाइनाथ स्तैर्मयो-पासनिना स्तुतस्त्वम ।
रमेन्मनो मे तव पादयुग्मे, भृडो, यथाब्जे मकरंदलुब्धः ।। 12 ।।

अनेकजन्मार्जीत-पापसंक्षयो, भवेद्घवत्पादसरोजदर्शनात् ।
क्षमस्व सर्वानपराधपूंजकान्प्रसीद साईश गुरो दयानिधे ।। 13 ।।

श्री साईनाथचरणामृतपूतचित्तास्तत्पादसेवनरताः सततं च भक्त्या ।
संसारजन्यदुरतौधविनिर्गतास्ते कैवल्यधाम परमं समवाप्नुवन्ति ।। 14 ।।

स्तोत्रमेतत्पठेद्घक्त्या यो नरस्तन्मनाः सदा ।
सदगुरोः साईनाथस्य कृपापात्रं भवेद् ध्रुवम ।। 15 ।।

साइनाथकृपास्वर्दुसत्पघकुसुमावलिः ।
श्रेयसे च मनःशुध्यै प्रेमसूत्रेण गुंफिता ।। 16 ।।

गोविंदसूरिपुत्रेण काशीनाथा भिधायिना ।
उपासनीत्युपाख्येन श्री साईगुरवेडर्पिता ।। 17 ।।

इति साईनाथमहिम्नस्तोत्रं संपूर्णम ।।

प्रार्थना

करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वाडपराधम् ।
विदितमविदितं वा सर्वमेतत्क्षमतस्व जय जय करुणाब्धे (श्रीप्रभो साईनाथ) ।। 1 ।।

श्री सच्चिदानंदसदगुरु साईनाथ महाराज की जय

माध्यान्ह आरतीचा कार्यक्रम समाप्त ।

« Last Edit: December 23, 2007, 11:26:02 AM by Sai Baba »

December 22, 2007, 11:24:29 PM

About The Author

Comments

Add a Comment

Only registered members can post comments, please click here to register.

Pages: [1]